नवी मुंबई: एपीएमसी वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर धडक कारवाई करत गेल्या ५ महिन्यांत १ कोटी ७१ लाख ५१ हजार ५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. एपीएमसी वाहतूक शाखेकडून जानेवारी ते मे २०२४ या पाच महिन्याच्या कालावधीत जवळपास १६ हजार ६० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली. सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले असून, वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक विमल बिडबे व त्यांच्या पथकाने विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.