रायगड: रायगडमधुन एक बातमी समोर आली आहे. येथे अंमली पदार्थ बनवणाऱ्या छोट्या कारखान्यावर एनसीबीने कारवाई केली आहे. रायगडच्या महाड येथील एमआयडीसीमध्ये हा कारखाना सुरु करण्यात आला होता. भांडुपमधील एका अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या व्यक्तीवर एनसीबीने कारवाई केल्यानंतर या कारखान्याची माहिती समोर आली.
अधिक माहिती अशी की, एनसीबीने भांडुप मधील एका अंमली पदार्थ तस्कराला पकडले होते. त्याची चौकशी केली असता रायगडच्या महाड येथील एमआयडीसीमध्ये अंमली पदार्थ निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी दोन जणांना एनसीबीने अटक केली असून या कारवाईत एनसीबीने अंदाजे 50 कोटी रुपयांचे 46 किलो मॅफेड्रोन जप्त केले आहे.
या प्रकरणी एनसीबीने छापा टाकत ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यातील साहित्य जप्त केले आहे. अधिक तपास एनसीबी करत आहे.