नवीन पनवेल : नैना क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग पाडण्यास दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. यावेळी जवळपास ३० हून अधिक होर्डिंग पाडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पनवेल तालुक्यातील २३ गावांमध्ये नैनाची अधिकृत परवानगी न घेता अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आलेले आहेत.
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. सोमवारी सुकापूर, आदई, शिलोत्तर रायचूर माहेत. येथील १७ ते १८ मोठमोठे होर्डिंग काढण्यात आले, तर २८ मे रोजी आकुर्ली, विहिघर येथील होर्डिंग गॅस कटरच्या सहाय्याने पाडण्यात आले. तर काहींनी स्वतःहून हे होर्डिंग काढून घेतले.