नवी मुंबई : बांधकाम व्यावसायिक आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्स सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकरचे वडील गुरु चिचकरने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या मुलावर नार्को टेस्ट विभागाच्या केसेस दाखल झाल्या आहेत. या विभागातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे.
नवी मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु चिचकारने स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी गुरु चिचकरने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. जी पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु चिचकर हे भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्स सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकरचे वडील आहेत. नवीन चिचकर हा सध्या देश सोडून पळून गेला आहे. नवीन चिचकर हा एनसीबीला अनेक गुन्ह्यांमध्ये हवा आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चिचकर देशाबाहेरून आपला ड्रग्जचा व्यवसाय चालवतो.