Saturday, May 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दुचाकी घसरून तरुणाचा जागीच मृत्यू, मित्र गंभीर जखमी

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 9 March 2026, 16:16

 Accident News: रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव वेगातील दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात (Accident) झाला. या अपघातात अद्वैत प्रवीण गीते या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अद्वैत गीते हा शनिवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरून मुंबई-गोवा महामार्गावरून कळंबणीच्या दिशेने जात होता. भरणे-शिंदेवाडी परिसरात आल्यानंतर अचानक दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर घसरली आणि दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात अद्वैत रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर आदळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

अद्वैत गीते हा खेड तालुक्यातील तिसंगी गावचा रहिवासी होता. त्याचे वडील प्रवीण गीते हे नवभारत हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अद्वैत आपल्या मित्रांसोबत रात्रीच्या जेवणासाठी कळंबणी येथे जात असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.

या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला अद्वैतचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकुलत्या एक मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने गीते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात महागाईची “दुसरी लाट” येणार! आरबीआयचा देशाच्या अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा

Friday, 22 May 2026, 23:01

पुण्यात कौटुंबिक वादातून मुलाचा अजब कारनामा! वडिलांच्या मित्राची रिक्षा चोरून फरार; गुन्हा दाखल

Friday, 22 May 2026, 22:13

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मोठी अपडेट! एनटीएची “फिजिक्स” तज्ज्ञ मनीषा हवालदार सीबीआयच्या जाळ्यात

Friday, 22 May 2026, 21:21

कोंढवा, हडपसर जलमय; वाडकर मळ्यातील रस्ते पाण्याखाली! पहिल्याच पावसात पुणे महापालिकेचं “कागदी” नियोजन चव्हाट्यावर

Friday, 22 May 2026, 20:41

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कामशेत बोगद्यात एकाच वेळी दोन मोठे अपघात! निसरड्या रस्त्यामुळे गाड्या घसरल्या; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Friday, 22 May 2026, 20:09

‘सांग माझी बायको कुठे आहे’ पुण्यात दारुपार्टीत दोन मित्रांमध्ये वाद; रागाच्या भरात बियरच्या बाटलीने मित्रावर हल्ला

Friday, 22 May 2026, 19:27
Next Post
Bhor

Bhor : भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.