रायगड : रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहावीच्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच जीवन संपवल्याची घटना घडली आहे. रायगडच्या महाडमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे महाडमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली? यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाडच्या ताबट अळीमध्ये सुयश नगरकर (१५ वर्षे) हा आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. सुयश दहावीमध्ये शिकत होता. सुयशने गुरूवारी दुपारी राहत्या घरामध्येच बंदुकीमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. डोक्यावर गोळी लागल्यामुळे सुयशचा जागीच मृत्यू झाला. सुयशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
घरामध्ये सुयश रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता. या घटनेची माहिती मिळताच सुयशच्या घराबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुयशने आत्महत्या का केली याचा तपास सद्या पोलिस करत आहे. सुयशचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.