Kolhapur News : कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर कोल्हापुरात मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील मुख्य चौकात दोन गटात राडा झाल्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी आज घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे. जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला. दरम्यान, शहरातील दूरसंचार कंपन्यांना इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Kolhapur violence! Orders telecom companies to shut down internet services)
कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. शहरात शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणण्याचे निर्देश केले आहे. (Kolhapur News) यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
कोल्हापुरात शिवाजी चौक परिसराला लागून असलेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या भाग, गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला तसेच शिवाजी रोड आदी ठिकाणी तोडफोडीच्या घटना समोर आल्या. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. (Kolhapur News) मात्र पोलिसांनी बळाचा आणि संयमाचा उत्कृष्टपणे वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी साडेबारापर्यंत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आली होती. मात्र, त्यानंतर दबा धरुन बसलेले तरुण पुन्हा एकदा रस्त्यावर आल्याने पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणात
कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा : जिल्ह्याधिकाऱ्यांचे आवाहन
आपण कधीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं कोल्हापुरच्या जिल्हाधिकाऱी राहुल रेखावार यांनी म्हटलंय. शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचं बारीक लक्ष आहे. अतिरिक्त पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. (Kolhapur News) शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.
राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृह विभागाचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलतोय, ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही स्वतः अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.