Kolhapur News : कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर कोल्हापुरात मोठा हिंसाचार झाला आहे. कोल्हापुरातील मुख्य चौकात दोन गटात राडा झाल्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी आज घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे. जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला. कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल असे फडणवीस म्हणाले आहेत. (Home Minister Devendra Fadnavis’s first reaction to the Kolhapur incident, said…)
अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल
गृहमंत्री फडवीस म्हणाले, ‘अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणून बुजून कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे, हे कोण करीत आहे तपासून बघावा लागेल, कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, (Kolhapur News) पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कायदा कोणी हातात घेऊ नये कुठलाही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही, असा कडक इशारा फडणवीस यांनी दिला.
‘या ठिकाणी कधीही औरंगजेबाचा उदात्तीकरण होऊ शकणार नाही. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे पण हे जे नव्हे कोण आहेत हे शोधून काढावे लागेल आणि आम्ही ते शोधून काढू, मात्र महाराष्ट्र कायदा हातात घेतल्यामुळे एकीकडे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच पण त्यासोबत महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे.(Kolhapur News) त्याच्यावरही त्याच्यामुळे कुठेतरी डाग लागतो, म्हणून सगळ्यांना विनंती आहे कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई करावीच लागेल, असंही फडणवीस म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kolhapur News : कोल्हापूर हिंसाचार! दूरसंचार कंपन्यांना इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश