Khalapur News : खालापूर : रायगड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खालापूरजवळील इर्शाळवाडीत मोठी दुर्घटना घडली. बुधवारी (ता. १९ जुलै) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास इर्शाळगडावर दरड कोसळली. त्यामुळे पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गाव भुईसपाट झाले आहे. या गावात ४५ ते ५० घरांची वस्ती आहे, यातील ३० ते ४० घरातील लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
३० ते ४० घरातील लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती
रायगडमधील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात सुमारे अडीचशे लोकसंख्या असलेले गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढलं गेलं आहे.(Khalapur News ) ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २५ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर सात जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, मदत व बचावकार्याचा आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (Khalapur News ) या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून घटनेची माहिती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खोदकामादरम्यान २१ वर्षीय कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू :