Karmala News : करमाळा : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार जयवंतराव जगताप व उपसभापतीपदी शैलजा मेहेर यांची बिनविरोध निवड झाली. विजयादशमीच्या मुर्हूतावर ही निवड झाली आहे. निवड होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जगताप यांचा सत्कार करण्यासाठी बाजार समितीच्या आवारात गर्दी केली केली. जगताप हे सहाव्यांदा सभापती झाले आहेत. तर मेहेर यांना प्रथमच महिला उपसभापती होण्याचा मान मिळाला आहे.
प्रथमच उपसभापतीपदी महिला विराजमान
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच या वेळी निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळाची सभापती व उपसभापती निवडीसाठी बैठक झाली. (Karmala News) सभापती पदासाठी माजी आमदार जगताप व उपसभापती पदासाठी मेहेर यांचा एकमेव अर्ज आला.
करमाळा बाजार समितीवर जगताप गटाचे सुरुवातीपासून वर्चस्व असून, सर्वाधिक काळ म्हणजे २९ वर्षे जगताप यांनी बाजार समितीचे सभापतीपद भूषविले होते. (Karmala News) गेल्या पंचवार्षिकमध्ये प्रा. शिवाजी बंडगर हे सभापती होते. यापूर्वी झालेला वाद आणि राजकीय परिस्थिती पहाता यावेळी निवडणूक बिनविरोध झाली हे विशेष मानले जात आहे.
या सभेवेळी बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप, महादेव कामटे, जनार्धन नलवडे, रामदास गुंडगीरे, सागर दोंड, तात्यासाहेब शिंदे, नागनाथ लकडे, शिवाजी राखुंडे, साधना पवार, नवनाथ झोळ, काशीनाथ काकडे, कुलदीप पाटील, बाळू पवार, मनोज पितळे, परेश दोशी, वालचंद रोडगे उपस्थित होते. (Karmala News) प्रास्ताविक अशोक नरसाळे यांनी केले. तर आभार सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Karmala News : घरतवाडी-कुंभारगाव रस्त्याचे काम निकृष्ट ; ठेकेदाराचा मनमानी कारभार चव्हाट्यावर
karmala News : घरतवाडी-कुंभारगाव रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
Karmala News : मांगी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; २० दिवसांत १५ जनावरांचा फडशा