Jalgaon News : जळगाव : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर शहरात मन सुन्न करणारी एक घटना मंगळवारी घडली. आजीची प्रकृती खालावल्याने तिला पाहण्यासाठी २४ वर्षीय नातू गावात आला. घराच्या पायऱ्या चढून आजीची चौकशी करणार, एवढ्यात त्याच्यावर काळाने घाला घातला. पायरीवरच त्याला हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्याची प्रणज्योत मालवली. हा मोठा धक्का पचत नाही एवढ्यात अवघ्या दोन तासांनंतर आजीनेही जगाचा निरोप घेतला. तरुण नातून आणि नव्वदीतल्या आजीने एकाच दिवशी प्राण गमावल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
फैजपूर शहरातील हृदयद्रावक घटना
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर शहरात ही हृदयद्रावक घटना घडली. वैभव विष्णू मोरे (वय २४) असे मृत नातवाचे नाव आहे, तर कमलाबाई कोंडू मोरे (वय ९०) असे आजीचे नाव आहे. (Jalgaon News) फैजपूर शहरातील लक्कड पेठ भागात मोरे कुटुंब वास्तव्याला आहे. डी.के. मोरे ज्वेलर्स नावाचे त्यांचे दुकान आहे. आई कमलाबाई दत्तात्रय त्यांची या मुलाकडे राहत होत्या, तर त्यांचे दुसरे भाऊ विष्णू मोरे हे त्यांच्या कुटुंबासह फैजपूर शहरातीलच भारंबे वाड्यात राहतात.
दरम्यान, नव्वदीतल्या आजी कमलाबाई यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दत्तात्रेय यांनी मंगळवारी सकाळी भाऊ विष्णू मोरे यांना कळविली. आजीची प्रकृती गंभीर असल्याचे कळताच विष्णू मोरे यांचा मुलगा वैभव आजीला पाहण्यासाठी काकाच्या घरी निघाला. घराची पायरी चढताच वैभवला हृदयविकाराचा झटका आला. (Jalgaon News) यात तो खाली कोसळला. नातेवाईक तसेच शेजाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैभवला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासांतच वैभवची आजी कमलाबाई यांनी प्राण सोडला.
एकाच दिवशी अवघ्या दोन तासांच्या अंतराने आजी व नातवाचा मृत्यू झाल्याने फैजपूर शहरावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी दुपारी आजी आणि नातवाची एकाचवेळी अंत्ययात्रा निघाली. (Jalgaon News) शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Jalgaon News : धक्कादायक! जळगावात महाविद्यालयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Jalgaon News : पोलिस दलात हळहळ! तपासासाठी निघाले अन् काळाने केला घात
Jalgaon News : लग्नानंतर दोन दिवसात नवविवाहितेची प्रियकरासह आत्महत्या