Jalgaon News : जळगाव : मध्य रेल्वे भुसावळ विभागाचा वाणिज्य महसूलाने उच्चांक गाठला असून, सप्टेंबर अखेर १३४.०३ लाख रूपये उत्पन्न विविध प्रकारातून मिळाले आहे. यात प्रवासी वाहतूक ६६ कोटी ८ लाख, तर विना तिकीट प्रवाशांकडून दंडापोटी साडेतीन कोटींचा महसूल वसूल करण्यात आला.
प्रवासी वाहतुकीतून मिळाले ६६ कोटी
मध्य रेल्वे प्रशासनाला आतापर्यंत १३४ कोटी रूपये उत्पन्न मिळाले आहे. कोट्यवधींचा महसूल मिळाला असून, यामध्ये सर्वाधिक उत्पन्न प्रवासी वाहतूक ६६ कोटी ८ लाख, माल वाहतूक ३४ कोटी १७ लाख, पार्सल वाहतूक १२ कोटी ४३ लाख, (Jalgaon News) विनातिकिट प्रवासी तपासणीत ४८ हजार केसेसमधून ३ कोटी ५० लाख, पार्किंग ३६ कोटी २८ लाख, वाणिज्य प्रसिद्धी, जाहिराती आणि इतर १६ कोटी २७ लाख, केटरींग हॉटेल खानपान विभागातून ४२ कोटी ३९ लाख रूपये याशिवाय अन्य महसूली उत्पन्न १ कोटी २४ लाख आहे.
१ एप्रिल २०२३ ते १० सप्टेंबर २०२३ या कालावधीत ४८५ रेकच्या ऑटोमोबाईल लोडिंगमधून महसूल म्हणून रु. ८२.७८ कोटींची नोंद झाली आहे. (Jalgaon News) २०२३-२४ या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेकडून एकूण ४८,५०० ऑटोमोबाईल्सची वाहतूक करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Jalgaon News : आजारी आजीच्या भेटीला नातू गेला अन् दोघांची अंत्ययात्रा एकाचवेळी…
Jalgaon News : धक्कादायक! जळगावात महाविद्यालयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Jalgaon News : पोलिस दलात हळहळ! तपासासाठी निघाले अन् काळाने केला घात