करमाळा, कोर्टी, ता. 06: करमाळा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात कारणातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली आहे. यावरून पत्नी मृत तर पती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. सुरुवातीला करमाळा पोलीस स्टेशन येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मृत मुलाच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि धक्कादायक घटना नेमकी घडली कशी याचा पोलीस तपास करत आहेत. युवराज लक्ष्मण शेरे (वय ३१), रूपाली युवराज शेरे (वय २५) असे मृत जोडप्याचे नाव आहे. कोर्टी ता.करमाळा येथील हुलगेवाडी रस्त्यावरील शेरे वस्ती येथे मयत दांपत्य राहत होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दळवी हे करीत आहेत.