पुणे : आज दसरा, हिंदू धर्मात दसरा सणाला विशेष महत्व आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजन केलं जातं. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा साजरा केला जात असतो. पंचांगानुसार, यंदा 12 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्याला विजयादशमी नावाने सुद्धा ओळखलं जातं. या दिवशी अपराजिता देवी पूजन शमी पूजन आणि रावण दहन केलं जातं असतं.
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून पौराणिक कथेनुसार,या दिवशी दुर्गा देवीने देवी चंडीकेचं रुप धारण करुन महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता असं मानलं जातं. तसेच, याच दिवशी रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाने त्याच्या शस्त्रांची पूजा केली होती. त्याच वेळी महिषासुराशी युद्धासाठी देवतांनी मिळून दुर्गा देवीच्या शस्त्रांची पूजा केली. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाला आहे.
यंदाचा दसरा नेमका कधी?
पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी 12 ऑक्टोबरच्या सकाळी 10:58 वाजता सुरू झाली असून 13 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी दसरा तिथी संपणार आहे. तिथीनुसार, यावर्षी दसरा 12 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे.
शस्त्र पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता?
दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्तामध्ये शस्त्र पूजा केली जात असते. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2 वाजून 3 मिनिटं ते 2 वाजून 49 मिनिटापर्यंत असणारा आहे.
या मुहूर्तावर शस्त्रांची पूजा करता येणार आहे.
हे असणार दसऱ्याला 4 दुर्मिळ योग..
- रवि योग
- शश योग
- मालव्य योग
- सर्वार्थ सिद्धी योग
या शुभ योगांत कोणतंही काम केल्यास ते पूर्ण होतं असतं, असं बोललं जातं. दसऱ्याला रवि योग दिवसभर असल्यामुळे या दिवशी सर्व प्रकारचे दोष दूर होतील. तसेच सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल.
शस्त्र पूजेची पद्धत..
विजय मुहूर्तावर शस्त्रांची पूजा सुरू करून सर्व शस्त्रांवर गंगाजल शिंपडून शुद्ध करा. यानंतर हातांवर हळद-कुंकवाचा टिळा लावावा. नंतर फुलं आणि शमीची पानं अर्पण करा. गरीब आणि गरजूंना अन्न द्या. नवरात्रीच्या नऊ दिवसांनी दशमी तिथीला यश देवो बोलून देवीचं स्मरण करून शस्त्रांची पूजा करावी.