Heat Stroke | नांदेड : राज्यभरात उन्हाच्या झळा चांगल्याच बसू लागल्या आहेत. दरम्यान हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णतेच्या या लाटांमुळे अनेकांना उष्मघातांचा त्रास होत आहे. काल जळगाव जिल्ह्यात उष्मघातामुळे एका विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना आज नांदेडमध्ये उष्मगातामुळे एका 28 वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
विशाल रामराव मादसवार असे मृत पावलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.
विशाल यास सुरुवातीला उष्मघात व त्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्याची प्राणज्योत मालावली आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील हा शेतकरी होता. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विशाल हा भर उन्हात शेतात गेला होता. त्यावेळी त्यांने शेतीची काही कामे केली. शेतीतील कामे करून तो सांयकाळी 6 वाजच्या दरम्यान घरी आला. त्यानंतर त्यांला अस्वस्थ वाटू लागले. मात्र याकडे विशालने दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी त्याची तब्येत अचानक खालावली. कुटूंबीयांनी तात्काळ त्याला रुग्णालयात हलवले.
मात्र रुग्णालयात पोहचल्यावर त्याला ह्रदयविकाराचा झटका आला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Heat Stroke : लग्नाचा आनंद काळाने घेतला हिरावून ; उष्माघाताने विवाहितेचा मुत्यू ; जळगावातील घटना..