(Gudi Padwa )गडचिरोली : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ( Gudi Padwa) महिलांसाठी अजून एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या पाठोपाठ आता गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिशनच्या खासगी बसमध्येही महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय देण्यात आला आहे. आणि आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तापासून हे नवे तिकीट दर लागू होणार असल्याची माहिती असोसिशनकडून देण्यात आली आहे.
एसटी बसेसमध्ये महिलांची गर्दी…!
राज्य सरकारने नुकताच राज्य परिवहन महामंडळच्या बसेसमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सूट १७ मार्च पासून देण्यात सुरवात केली आहे. एसटी बसेसमध्ये महिलांची गर्दी वाढल्याचे चित्र समाजमाध्यमावर दिसू लागले होते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनामध्ये महिला प्रवाशांची संख्या रोडावली होती.
दरम्यान, यावर उपाय म्हणून गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिशनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत गडचिरोली –चंद्रपूर मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे.
याबाबत बोलताना संघटनेचे सदस्य राजू कावळे म्हणाले की, ”या निर्णयाचा महिलांना नक्की फायदा होईल. तसेच खाजगी बसेसमध्ये सुध्दा महिला प्रवाशांची संख्या पूर्वपदावर येईल.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
MSRTC News |राज्यातील महिलांसाठी खुशखबर! आजपासून महिलांना एस टी बस प्रवासात ५० टक्के सवलत!
MSRTC : शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचे स्थलांतर होणार!
पीएमपीच्या प्रवाशांचे झाले हाल ; ठेकेदारांच्या अचानक संपाचा बसला फटका