Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : प्रेम, वात्सल्य, भितीदायक दृष्य.. ती…आली, तीन पाहिलं…अन बछड्यांना मायेन तोंडात घेतल ; बिबट्याचे चार बछडे अखेर आईच्या कुशीत…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 March 2023, 12:33

युनूस तांबोळी

(Shirur News) शिरूर :  रात्रीची वेळ होती…ऊसाच्या फडातून बिबटयाच्या गुरगुरण्याचा आवाज येत होता. आम्ही मात्र बछड्यांना बास्केटमध्ये सुरक्षित ठेवत होतो. मादीच्या गुरगुरण्याचा आवाजाने सगळेच भयभीत झाले होते. क्षणाचाही विलंब न लावता आम्ही सुरक्षीत अंतरावर गेलो. काळोखी रात्र, रातकिंड्याचा आवाज आणि ऊसाच्या पाचटावर बिबट्याच्या पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. बिबट्याची मादी दबक्या पावलाने बछड्यांजवळ आली.

आईच्या कुशीत बछडे विसावल्याने ऑपरेशन यशस्वी…!

ती… आली तिनं पाहिलं… अन एकेक पिल्लू हळूवार तोंडात घेऊन उसाच्या फडात जाऊ लागली. शेवटचा बछडा घेऊन गेल्यावर सर्वांनीच टाळ्या वाजविल्या. मादी आणि बछड्यांच वात्सल्य, प्रेम आणि भितीदायक वातावरणातील ते दृष्य आम्ही अनुभवत होतो. अखेर आईच्या कुशीत बछडे विसावल्याने ऑपरेशन यशस्वी झाले होते.

 

सविंदणे ( ता. शिरूर ) येथील  (Shirur News ) लंघेमळ्यात आईपासून दूरावलेले चार बछडे अखेर रात्रीच्या काळोखात सोमवारी ( ता. २० ) पुन्हा आईच्या कुशीत विसावले. या घटने बाबत वनविभागाने माहिती देताना संपूर्ण चित्रच उभे केले. आई आणि पिलांची ताटातूट झाल्याने बिबट्याचे बछडे भेदरले होते. तर बिबट मादी देखील सैरभैर होऊन परिसरात डरकाळ्या मारत होती. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अनेकांनी हा थरार अनुभवला आणि बिबट मादी पिलांना घेऊन जातानाचे हेलावून टाकणारे दृष्यही पाहिले.

येथील पंढरीनाथ धोडींबा लंघे उसाच्या फडात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट मादी व चार बछड्याच्या ताटातुटीच्या प्रसंगाला सोमवारी रात्री विराम मिळाला. बिबट मादी आपल्या चार बछड्यांसह या फडात वास्तव्याला होती. दरम्यान ऊसतोड चालू झाल्याने निवारा हिरावला जाण्याच्या आणि बछड्यांच्या सुरक्षेकरीता बिबट मादिने डरकाळ्या फोडत ऊसतोड कामगारांवर रविवारी ( ता. १९ ) सायंकाळी हल्ला केला होता. मात्र वेळीच सर्व ऊसतोड कामगार ऊसाच्या फडातून बाहेर पळाल्याने अनर्थ टळला. यात एका महिला जखम झाली.

या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी याच ऊसाच्या फडात चार बछडे आढळून आले. त्यामुळे मादीही याच परिसरात असेल या धास्तीने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. ऊसतोडणीचे काम ही ठप्प झाले.

दरम्यान, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपाल गमेश पवार, वनरक्षक ऋषीकेश लाड, वनकर्मचारी हनुमंत कारकूड, व शौकत शेख यांनी घटनास्ळी धाव घेऊन चारही बछडे ताब्यात घेतले. त्यांना पुन्हा आईकडे सोडविण्यासाठी सोमवार सायंकाळपासून रि युनियन ऑपरेशन राबविण्यात आले. त्यानूसार, जेथे हे बछडे सापडले होते.

त्याच जागेवर दोन छोट्या लोंखडी बास्केटमध्ये हे बछडे ठेवण्यात आले. रात्री ऑपरेशन राबवित असतानाच ऊसाच्या फडातून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज येत होता. सव्वानऊच्या सुमारास बिबट मादीने बास्केटमधील एकेका पिल्लाला तोंडात धरून सुरक्षीतस्थळी हलविले. वनविभागाचे हे रि युनियन ऑपरेशनअनेकांनी ऊसाच्या फडाच्या काही अंतरावर थांबून प्रत्यक्ष अनुभवले. मादी चारही बिबट्यांना घेऊन गेल्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Shirur News : मलठणच्या उपसरपंचपदी दादासाहेब गावडे यांची बिनविरोध निवड!

Old Pension | अखेर सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला संप मागे ; चर्चा यशस्वी तर ‘उद्यापासून कामावर हजर व्हा; समन्वयक विश्वास काटकर यांचे आवाहन..!

Shirur News : आमदाबाद विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न!

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

World Cup 2023 : वनडे विश्वचषकाच्या तारखा जाहीर ; "या" दिवसापासून सुरु होणार स्पर्धा..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.