हुबळी: ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी रितेश कुमारला एन्काउंटरमध्ये ठार झाला आहे. कुमारला यापूर्वीच अटक करण्यात आली होती, परंतु त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर हल्ला केला, ज्यामुळे एन्काउंटर करण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, कुमारने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. जवळील परिसरातील एका शेडमध्ये मुलीचा मृतदेह आढळला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी कुमारचा शोध घेऊन त्याला अटक केली होती.
चकमकीदरम्यान, कुमारने पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये एक पीएसआय आणि दोन कॉन्स्टेबल जखमी झाले. पीएसआय अन्नपूर्णा यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, ज्यामध्ये कुमारच्या पाठीत आणि पायात गोळी लागली. कुमार यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी कुमारला आधी ताब्यात घेतले होते आणि ते प्रकरणाची चौकशी करत होते. कुमारने पळून जाण्याचा आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला त्यात आरोपी ठार झाल्याचे समोर आले आहे. हुबळी-धारवाडचे पोलिस आयुक्त एन. शशी कुमार यांनी चकमकीला दुजोरा देत म्हटले आहे की, पोलिसांवर हल्ला केल्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी कारवाई केली.