सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
पुरंदर: पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रेस सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये सूर्यनमस्कार, करण्यात आले. त्यानंतर मूर्तींना अभिषेक घालून, महापूजा करण्यात आली. तसेच सासवड मधील सर्व देवींच्या मूर्तींना नवीन पोशाख परिधान करण्यात आला. सकाळी नऊ वाजता मंदिराचा कळस ते बगाड पर्यंत नवीन ध्वज बांधून, माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते बगाडाची विधिवत पूजा करण्यात आली.
मंदिराचे पुजारी बापू गिरगोसावी यांना बगाडाचा मान देण्यात आला. त्यानंतर नारळ फोडून पाच प्रदक्षिणा घालून बगाड फिरवण्यात आले. आणि’ नाथ साहेबांचे चांगभलं’ चा जय घोषात यात्रेस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आमदार संजय जगताप यांच्यासह भैरवनाथ चैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार जगताप ,उपाध्यक्ष तुकाराम गिरमे, काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर गिरमे, उपाध्यक्ष दशरथ जगताप, सचिव त्रिंबक जगताप ,सखाराम लांडगे, रामभाऊ इनामके, जयसिंग जगताप, राजेंद्र जगताप ,रमेश जगताप, जितेंद्र जगताप, पांडुरंग भोसले, विजय जगताप, विलास जगताप, रामभाऊ भैरवकर, प्रवीण भोसले, प्रमोद बोरावके, तुषार जगताप, तसेच चैत्री उत्सव समितीचे मुख्य व्यवस्थापक पंत रवींद्र कुमार जगताप, देवस्थान ट्रस्ट उत्सव समितीचे पदाधिकारी, सासवडकर, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.