Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! मूल होत नाही म्हणून पत्नीवर तहसीलदाराकडून जादूटोणा; आता थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 14 April 2025, 13:55
Tahsildar sent in judicial custody for exploiting wife in nanded

नांदेड : मूल होत नाही म्हणून पत्नीला मानसिक त्रास देऊन जादूटोणा व अघोरी उपचार केले. सतत मानसिक व शारीरिक छळ करून दोन वेळा कानशिलावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अखेर तहसीलदार पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पोलिसांत धाव घेतली. गुन्हा दाखल करून शिवाजीनगर पोलिसांनी पतीला अटक केली. रविवार, १३ रोजी दुपारी पतीला न्यायालयात हजर केले असता, दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आरोपी तहसीलदाराची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

आरोपी असलेला तहसीलदार हा चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असून, पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून तहसीलदारासह दोन ‘डॉक्टर, सासू, सासऱ्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तहसीलदार हा नांदेडला आल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांचे पथक त्याच्या घरी जाऊन धडकले व आरोपीला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत आरोपीची चौकशी करून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

समोर आलेल्या माहितीनुसार, अविनाश शेंबटवाड हा चंद्रपूर जिल्ह्यात तहसीलदार पदावर कार्यरत आहे. दीड वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. तेव्हापासून पती-पत्नीत कौटुंबिक वाद सुरू होता. अनेकदा त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. पत्नीसह अविनाश शेंबटवाड यांना नातेवाईकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्यात फरक पडला नाही. दारू पिऊन मारहाण करणे, माहेरहून पैसे आणण्यासाठी मानसिक छळ करणे, नेहमी बळजबरी करणे आदीसह अन्य गंभीर आरोप असल्याचे तक्रारीत नमूद केल्याचे सांगण्यात आले.

दंडाधिकारी म्हणून सतत दबाब

मूल होत नाही म्हणून मानसिक त्रास देऊन जादूटोणा केल्याचा आरोपही पत्नीने तक्रारीत केला आहे. मी दंडाधिकारी असल्याने माझ्याविरुद्ध कुठेही तक्रार दे, काहीच होत नाही, असा नेहमी दबाव टाकून मारहाण करत असे. गंभीर बाब म्हणजे पतीने दोन वेळा कानशिलावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार तिने दिली आहे. दरम्यान, पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अविनाश शेंबटवाड याच्यासह दोन डॉक्टर, सासू, सासरे व इतर जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम १०९, ७४, ७५, ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३), ३५२, ३, ५ याचबरोबर नरबळी, अमानुष अघोरी जादूटोणा प्रतिबंध तसेच पिस्तूल रोखल्याप्रकरणी शस्त्र अधिनियम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे करीत आहेत.

तीन नोटिसा पाठवल्या

तहसीलदार व त्यांच्या पत्नीत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सदरचे प्रकरण सुरुवातीला पोलीस दलातील महिला कक्षाकडे गेले होते. दोघांमध्ये समेट करण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. यासाठी दोन-तीन नोटिसाही पाठविण्यात आल्या; परंतु तहसीलदार हजर राहिला नसल्याने अखेर पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून १२ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शनिवारी रात्री आरोपी तहसीलदार याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली व रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अजितदादांचा अपघात नव्हे घातपातच! रोहित पवारांच्या खळबळजनक दावा; सरळ २ बड्या नेत्यांची नावं घेतली, नेमकं काय म्हणाले?

Monday, 16 November 2026, 17:03

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाचा भूखंड व्यवहार; बिल्डर तुपाशी, मालक उपाशी! चंद्रकांत वारघडे यांचा सनसनाटी आरोप

Monday, 16 November 2026, 16:56

“दोषी असेल त्याला फासावर लटवले जाणार,” अजित पवारांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!

Monday, 16 November 2026, 15:48

भिगवण–राशीन मार्गावर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 16 November 2026, 15:41

दोघंजण दुचाकीवरून आले, कॉलेजच्या प्रवेश्द्वारावरच तरुणाला उचललं नंतर डांगे चौकात नेऊन… पिंपरी-चिंचवडमधील विचित्र प्रकार….

Monday, 16 November 2026, 15:39

दादांच्या आठवणीने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, कंठ दाटून आला म्हणाल्या “ज्या जिल्हा परिषदेला जीवापाड जपले, आज तिथेच…”

Monday, 16 November 2026, 15:14
Next Post
Youth died in hospital as caught with fire parbhani

मित्रांनी पेट्रोल टाकून पेटवलेल्या युवकाचा मृत्यू; सात दिवस दिली मृत्यूशी झुंज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp