Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजितदादांचा अपघात नव्हे घातपातच! रोहित पवारांच्या खळबळजनक दावा; सरळ २ बड्या नेत्यांची नावं घेतली, नेमकं काय म्हणाले?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 16 November 2026, 17:03

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या बहुप्रतीक्षित पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांना विमानाने बारामतीला जाण्याची वेळ का आली, याबाबत माहिती मांडली. त्यांच्या पक्षातील दोन नेत्यांच्या फोनमुळे अजितदादांना गाडीने जाण्याचा प्रवास रद्द करावा लागला आणि अचानक विमान बुक करावे लागले, असा दावा त्यांनी केला. तसेच या प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत ब्लॅक बॉक्सचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणीही त्यांनी केली.

अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असल्याचा संशय रोहित पवार यांनी यापूर्वीही व्यक्त केला होता. या प्रकरणाच्या तपासाला गती का मिळत नाही, असा सवाल करत त्यांनी दिल्लीतील एका नेत्याकडेही यापूर्वी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत ते नेमका कोणता खुलासा करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेच्या तीन दिवस आधी वाय. बी. चव्हाण सेंटर परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरमुळेही या पत्रकार परिषदेची उत्सुकता वाढली होती.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला रोहित पवार म्हणाले, “अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरं काय घडलं, ते शोधणं आपल्या सर्वांच्या हातात आहे. आजची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे.”

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, अपघात की घातपात याबाबत अनेक लोकांनी त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. महाराष्ट्रधर्मावर विश्वास ठेवणाऱ्या अनेक व्यक्तींनी ही माहिती दिली आहे. मात्र, माहिती देणाऱ्या व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता असल्याने त्यांची नावे जाहीर करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही नेते मॅनेज होऊ शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. सत्य लोकांसमोर यावे यासाठी संबंधित व्यक्तींनी प्रयत्न केल्याचे सांगत त्यांचे ऋण विसरणार नसल्याचे ते म्हणाले.

अजित पवार यांना विमानाने बारामतीला का जावे लागले, याबाबत रोहित पवार यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले, “अजितदादा गाडीने बारामतीला का गेले नाहीत? कारण त्यांच्या पक्षाचे दोन नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्यांना फोन केले. यापैकी प्रफुल्ल पटेल यांनी फोन करून मी भेटायला येतो, असे सांगितले. मात्र, ते उशिरा आले. एका व्यक्तीचा फोन आला आणि माझी फाईल आहे, ती सही केल्याशिवाय जाऊ नका, असे सांगण्यात आले. त्यामुळे अजित पवार यांना गाडीने जाण्याचा प्रवास रद्द करावा लागला. त्यांना अचानक विमान बुक करावे लागले.”

या घटनाक्रमामुळे अजित पवार यांना विमानाने प्रवास करावा लागला, असा दावा रोहित पवार यांनी केला. मात्र, विमानाने जाण्याचा निर्णय चुकून घेतला की मुद्दामून, याचा तपास व्हायला हवा, असेही त्यांनी म्हटले.

विमान अपघाताच्या तांत्रिक बाबींवरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या दाव्यानुसार, रडार आणि इतर बाबींचा अभ्यास केला असता काही यंत्रणा बंद असल्याचे दिसून आले. वातावरण खराब होते आणि विमान अपेक्षेपेक्षा लवकर कमी उंचीवर आले होते. अपघातापूर्वीच्या शेवटच्या काही मिनिटांत मुख्य पायलटकडून एकही शब्द बोलला गेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

विमानात अतिरिक्त इंधन होते, हे अहवालातून सिद्ध झाल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला. या सर्व बाबींची सखोल तांत्रिक चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

या प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल झालेला नसल्याबद्दल रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तपास पूर्ण होईपर्यंत व्हीएसआर कंपनीचे कामकाज बंद ठेवण्याची मागणी केली होती; मात्र सीआयडी आणि राज्य सरकारने ती मान्य केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

“ब्लॅक बॉक्समध्ये गडबड करता येते. त्यामुळे त्याचे फॉरेन्सिक ऑडिट होणे महत्त्वाचे आहे,” असे रोहित पवार म्हणाले. अपघाताला साडेनऊ महिने उलटूनही ठोस माहिती समोर आलेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सध्या त्यांच्या हातात सत्ता नसल्याने तपास यंत्रणांकडून अपेक्षित माहिती मिळत नसल्याचेही ते म्हणाले.

अजित पवार यांच्या पक्षातील नेते आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याची विनंती केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. DGCA आणि AAIB या यंत्रणा विमान अपघाताचा तांत्रिक तपास करतात. मात्र, या यंत्रणांच्या कामकाजाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

DGCA आणि AAIB यांच्या भूमिकेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्रयत्न करता येऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी मांडलेले दावे आणि उपस्थित केलेले प्रश्न यावर आता राज्य सरकार तसेच संबंधित तपास यंत्रणा काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पत्रकार परिषदेत मांडलेले आरोप आणि संशय हे रोहित पवार यांचे दावे असून, त्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी होणे अद्याप बाकी आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07

Saswad News : विहिरीच्या पाण्यावरून चुलत भावांमध्ये राडा; दगडफेकीत आर्थिक नुकसान

Monday, 16 November 2026, 18:04

‘मफलर मॅन’ म्हणून रोहित पवारांनी दाखवला फडणवीसांचा फोटो! म्हणाले “या व्यक्तीने घातपात केला असं..” महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

Monday, 16 November 2026, 17:59

रेशनकार्ड विभक्त करताच धान्य बंद; उत्पन्नाचा दाखला अनिवार्य!

Monday, 16 November 2026, 17:42

अजितदादांचा अपघात नव्हे घातपातच! रोहित पवारांच्या खळबळजनक दावा; सरळ २ बड्या नेत्यांची नावं घेतली, नेमकं काय म्हणाले?

Monday, 16 November 2026, 17:03
Next Post

रेशनकार्ड विभक्त करताच धान्य बंद; उत्पन्नाचा दाखला अनिवार्य!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp