Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“दोषी असेल त्याला फासावर लटवले जाणार,” अजित पवारांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 16 November 2026, 15:48

पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून या प्रकरणाच्या तपासाची मागणी सातत्याने केली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर थेट भाष्य केले आहे. अजितदादांच्या विमान अपघातात जो कोणी दोषी आढळेल, त्याला फासावर लटकवले जाईल, असे ठाम विधान मुख्यमंत्र्यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस बोलत होते.

अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री फडणवीस भावुक झाले. ते म्हणाले, “दादा पहाटे सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करायचे. त्यानंतर मी काम करायचो आणि एकनाथ शिंदे रात्री उशिरापर्यंत काम करायचे. अजितदादांची कामाची जी शिस्त होती, ती राजकारणात फार क्वचितच पाहायला मिळते. वरून अतिशय कणखर वाटणारे दादा आतून तितकेच प्रेमळ होते. आम्हाला दादांच्या रूपाने एक भक्कम आधार होता. आज राज्यात जी भीषण दुष्काळी परिस्थिती आहे, त्या काळात त्यांची प्रकर्षाने आठवण येते.”

पुणे जिल्हा आणि अजित पवार यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याचाही फडणवीस यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, “पुणे जिल्ह्याबद्दल दादांच्या मनात एक वेगळीच आत्मीयता होती. पुण्याच्या प्रगतीचा आलेख लिहिताना अजितदादांच्या कार्याचे सुवर्णपान लिहिल्याशिवाय तो पूर्ण होऊच शकत नाही.”

अजित पवार यांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले, “राजकारणात थेट बोलणारे नेते फार कमी असतात. अजितदादांकडे ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोनच शब्द होते. जे पटले त्याला हो म्हणायचे आणि जे पटले नाही, ते थेट तोंडावर सांगण्याची हिंमत त्यांच्यात होती.”

अजित पवार यांच्या निधनानंतर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर बोलताना फडणवीस म्हणाले, “अजितदादा गेल्यानंतर समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा अपघात आहे की घातपात, अशी शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे. सध्या विविध तपास यंत्रणांच्या टीम या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. सामान्य माणसाच्या मनातील संभ्रम दूर झालाच पाहिजे.”

या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, त्याला फासावर लटकवले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच, हा अपघात असल्यास त्याचा अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाईल, असे आश्वासन अमित शाह यांनी दिल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानामुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अजितदादांचा अपघात नव्हे घातपातच! रोहित पवारांच्या खळबळजनक दावा; सरळ २ बड्या नेत्यांची नावं घेतली, नेमकं काय म्हणाले?

Monday, 16 November 2026, 17:03

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाचा भूखंड व्यवहार; बिल्डर तुपाशी, मालक उपाशी! चंद्रकांत वारघडे यांचा सनसनाटी आरोप

Monday, 16 November 2026, 16:56

“दोषी असेल त्याला फासावर लटवले जाणार,” अजित पवारांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!

Monday, 16 November 2026, 15:48

भिगवण–राशीन मार्गावर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 16 November 2026, 15:41

दोघंजण दुचाकीवरून आले, कॉलेजच्या प्रवेश्द्वारावरच तरुणाला उचललं नंतर डांगे चौकात नेऊन… पिंपरी-चिंचवडमधील विचित्र प्रकार….

Monday, 16 November 2026, 15:39

दादांच्या आठवणीने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, कंठ दाटून आला म्हणाल्या “ज्या जिल्हा परिषदेला जीवापाड जपले, आज तिथेच…”

Monday, 16 November 2026, 15:14
Next Post

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाचा भूखंड व्यवहार; बिल्डर तुपाशी, मालक उपाशी! चंद्रकांत वारघडे यांचा सनसनाटी आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp