बुलढाणा : राज्यात सध्या उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे अनेक जिल्ह्यात तापमान 45° पेक्षा जास्त असल्याच दिसून येत आहे.दरम्यान महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी गेला असल्याची माहिती समोर आली आहे.बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. संस्कार सोनटक्के या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठ मध्ये सहावीच्या इयत्तेत शिकत असलेला संस्कार सोनटक्के याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.संस्कारला उन्हाचा त्रास झाल्याने त्याची तब्येत बिघडली. यानंतर त्याला उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात उष्मघाताचा पहिला बळी गेला आहे.
दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून त्याचा थेट फटका हा शाळकरी विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान दुसरीकडे सध्या राज्यातील सर्वाधिक तापमान 45 अंश तापमान मानले जात आहे. उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्यामुळे सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.