Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रात FDA चे धाडसत्र! 2.23 कोटींचा अन्नसाठा जप्त; 23 विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 20 November 2026, 11:23

मुंबई: राज्यातील अन्नपदार्थांमधील भेसळ आणि नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा वेग वाढवला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात तपासणी मोहीम राबवली जात असून, दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. या मोहिमेत आतापर्यंत सुमारे 2.23 कोटी रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच 23 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, 8 विनानोंदणी विक्रेत्यांचा व्यवसाय बंद करण्यात आला आहे.

या कारवाईत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे गंभीर प्रकार समोर आला. आयात केलेल्या अन्नपदार्थांच्या पाकिटांवरील उत्पादन तारीख, मुदत संपण्याची तारीख आणि कमाल किरकोळ विक्री किंमत (MRP) थिनरच्या मदतीने पुसून त्यावर नव्याने छपाई केली जात असल्याचे आढळले. या प्रकरणी संबंधित कंपनीचा 2.06 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

पुण्यातील जे. एम. रोडवरील खाऊ गल्लीत तपासणीदरम्यान 8 विक्रेते विनानोंदणी व्यवसाय करत असल्याचे आढळले. प्रशासनाने त्यांचा व्यवसाय बंद केला असून, त्यांच्याकडून 2.40 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय पुण्यासह राज्यातील विविध भागांत 23 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील 54 अन्न व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तसेच ठाणे, रायगड आणि पुणे परिसरात चहा मिक्स, तूप आणि जेलीपॉप असा एकूण 68,094 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

मुंबईत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 6 आस्थापनांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले.

दरम्यान, प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याविरोधातील मोहिमेत 16.42 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणांत 4 गुन्हे दाखल करून 7 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अन्नपदार्थांच्या विक्रीत नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांमध्ये प्रशासनाच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील भाजीमंडईसमोर दुचाकीने दिलेल्या धडकेत आजीचा पाय फ्रॅक्चर, अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल

Friday, 20 November 2026, 13:23

केसनंद येथे राधाई मोबाइल शॉपी चार चोरट्यांनी फोडली; शेजारचे सराफी दुकानही फोडण्याचा केला प्रयत्न

Friday, 20 November 2026, 12:52

कोलवडी येथे तडीपार आरोपीचा कोयता घेऊन पाठलाग ; ‘थांब, आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत तरुणाच्या कारच्या काचा फोडल्या

Friday, 20 November 2026, 12:40

घरात कोणी नसल्याची संधी साधली? लामजेवाडीत चोरट्यांचा डाव; सोन्या-चांदीसह रोकड केली लंपास

Friday, 20 November 2026, 12:33

पुण्यात रेल्वे सेवा कोलमडली!300 विशेष फेऱ्यांचा नियमित गाड्यांना फटका; प्रवाशांचा प्रवास रखडला, मनस्ताप वाढला

Friday, 20 November 2026, 12:18

सिग्नल कसा तोडला म्हणत अडवले अन्… पुण्यात तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 20 November 2026, 12:09
Next Post

पुण्यात शिंदे गटाचा संघटनात्मक फेरबदल! कामचुकार पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp