Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील भाजीमंडईसमोर दुचाकीने दिलेल्या धडकेत आजीचा पाय फ्रॅक्चर, अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 20 November 2026, 13:23

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील भाजीमंडईसमोर रस्ता ओलांडणाऱ्या 82 वर्षीय वृद्ध महिलेला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी (ता. 19 ) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे . या अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या उजव्या पायाच्या नडगीला व गुडघ्याला तसेच बरगडीला दुखापत झाली आहे. त्यांना फ्रॅक्चर झाले असून, विश्वराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गयुबाई बाबुराव कांबळे (वय 82 , रा. बौद्धवस्ती, लोणी काळभोर) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्नेहल हरीश्चंद्र कांबळे (वय 30) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलाच्या विरोधात मोटरवाहन अधिनियम, 1988 – 119,134,177,184 ; भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 125(b),281 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गयुबाई कांबळे या लोणी काळभोर भाजीमंडईमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या भाजी विक्रीसाठी मंडईत गेल्या होत्या. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी जाण्याकरिता त्या भाजीमंडईसमोरील लोणी फाटा ते लोणी गावाकडे जाणारा रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी लोणी गावाच्या बाजूने आलेल्या भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या नातवंडांनी घटनास्थळी धाव घेत खासगी रुग्णवाहिकेतून त्यांना विश्वराज रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, दुचाकीस्वाराच्या नातेवाइकांनी रुग्णालयात येऊन उपचाराचा खर्च करण्याची तयारी दर्शवित तक्रार न देण्याची विनंती केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संबंधित दुचाकीचा क्रमांक एमएच 12 आरएच 4326 असून, ती दुचाकी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या अपघातानंतर जखमी महिलेला मदत न करता दुचाकीस्वार घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी स्नेहल कांबळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील भाजीमंडईसमोर दुचाकीने दिलेल्या धडकेत आजीचा पाय फ्रॅक्चर, अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल

Friday, 20 November 2026, 13:23

केसनंद येथे राधाई मोबाइल शॉपी चार चोरट्यांनी फोडली; शेजारचे सराफी दुकानही फोडण्याचा केला प्रयत्न

Friday, 20 November 2026, 12:52

कोलवडी येथे तडीपार आरोपीचा कोयता घेऊन पाठलाग ; ‘थांब, आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत तरुणाच्या कारच्या काचा फोडल्या

Friday, 20 November 2026, 12:40

घरात कोणी नसल्याची संधी साधली? लामजेवाडीत चोरट्यांचा डाव; सोन्या-चांदीसह रोकड केली लंपास

Friday, 20 November 2026, 12:33

पुण्यात रेल्वे सेवा कोलमडली!300 विशेष फेऱ्यांचा नियमित गाड्यांना फटका; प्रवाशांचा प्रवास रखडला, मनस्ताप वाढला

Friday, 20 November 2026, 12:18

सिग्नल कसा तोडला म्हणत अडवले अन्… पुण्यात तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 20 November 2026, 12:09
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp