Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोलवडी येथे तडीपार आरोपीचा कोयता घेऊन पाठलाग ; ‘थांब, आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत तरुणाच्या कारच्या काचा फोडल्या

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 20 November 2026, 12:40

थेऊर : जुन्या संशयाच्या कारणावरून तडीपार आरोपीने साथीदारासह तरुणाचा पाठलाग करत त्याच्या कारवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. कोलवडी-मांजरी रोडवरील चिंतामणी आंगण सोसायटी परिसरात बुधवारी (ता. 18) सकाळी सुमारे पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सागर राजेंद्र भालसिंग (वय 32, रा. भालसिंग वस्ती, कोलवडी) आणि साहील तांबोळी (रा. कोलवडी) अशी आरोपींची नावे आहेत. यावेळी आरोपीने कारच्या पुढील व मागील काचा फोडून अंदाजे 30 हजार रुपयांचे नुकसान केले. जीव वाचवण्यासाठी तरुणाने थेट मांजरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महेश बाळासो भालसिंग (वय -26, रा. भालसिंग वस्ती, कोलवडी, ता. हवेली) यांनी याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश भालसिंग हे खराडी येथील ईऑन आयटी पार्कमध्ये नोकरी करतात. दोन वर्षांपूर्वी सागर भालसिंग याने संशयावरून महेश यांना मारहाण व शिवीगाळ करून धमकी दिली होती. त्यावेळी पोलिसांनी सागरला समज दिली होती. मात्र, त्यानंतरही तो अधूनमधून धमकावत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सागर याच्याविरुद्ध यापूर्वी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल असून, त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी (एमएच 12 जेझेड 1896) कार घेऊन मांजरीमार्गे खराडीकडे जात होते. चिंतामणी आंगण सोसायटी परिसरात सागर भालसिंग हा साहील तांबोळी याच्यासह मोपेडवरून त्यांच्या कारच्या मागे आला. दोघांनी शिवीगाळ सुरू केली. सागरच्या हातात कोयता असल्याचे महेश यांच्या निदर्शनास आले.

‘थांब, आज तुला जिवंत सोडत नाही,’ अशी धमकी देत आरोपींनी मोपेड कारसमोर आडवी लावली. घाबरलेल्या महेश यांनी कार रस्त्याच्या खाली उतरवून पुढे नेली. आरोपींनी वेगाने पाठलाग करत कारच्या उजव्या बाजूला येऊन सागरने हातातील कोयत्याने कारची पुढील काच फोडली. हल्ल्याच्या भीतीने महेश यांनी कार न थांबवता वेगाने मांजरी पोलीस ठाण्याच्या दिशेने धाव घेतली.

दरम्यान, मांजरी पोलीस ठाण्याजवळ कार उभी करून महेश जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर सागरने कारवर दगड मारून मागील काच फोडली आणि साहीलच्या मोपेडवरून घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात कारच्या दोन्ही काचा फुटल्याने सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

कोलवडी येथे तडीपार आरोपीचा कोयता घेऊन पाठलाग ; ‘थांब, आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत तरुणाच्या कारच्या काचा फोडल्या

Friday, 20 November 2026, 12:40

घरात कोणी नसल्याची संधी साधली? लामजेवाडीत चोरट्यांचा डाव; सोन्या-चांदीसह रोकड केली लंपास

Friday, 20 November 2026, 12:33

पुण्यात रेल्वे सेवा कोलमडली!300 विशेष फेऱ्यांचा नियमित गाड्यांना फटका; प्रवाशांचा प्रवास रखडला, मनस्ताप वाढला

Friday, 20 November 2026, 12:18

सिग्नल कसा तोडला म्हणत अडवले अन्… पुण्यात तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 20 November 2026, 12:09

कात्रज डेअरी चौकातील वाहतुकीत मोठा बदल! 19 नोव्हेंबरपासून स्वारगेटकडून येणारा राईट टर्न बंद

Friday, 20 November 2026, 11:55

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 25 वर्षांनंतर विज्ञानाचा जागतिक महोत्सव रंगणार; जगातील नोबेलविजेते शास्त्रज्ञ येणार पुण्यात

Friday, 20 November 2026, 11:49
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp