Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 25 वर्षांनंतर विज्ञानाचा जागतिक महोत्सव रंगणार; जगातील नोबेलविजेते शास्त्रज्ञ येणार पुण्यात

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 20 November 2026, 11:49

पुणे : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या घडामोडींचे साक्षीदार होण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. देशातील सर्वात मोठा विज्ञान महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’चे (IISF) आयोजन यंदा पुण्यात करण्यात येणार आहे. 19 ते 22 डिसेंबरदरम्यान हा महोत्सव पार पडणार असून, यामध्ये नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांसह देश-विदेशातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र (NCCS), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL), आयसर, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) आणि COEP तंत्रशास्त्र विद्यापीठ या 5 संस्था महोत्सवाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिल्लीमध्ये या महोत्सवाच्या पूर्वतयारीचा शुभारंभ केला.

यंदाच्या महोत्सवाची संकल्पना ‘भारताचे विज्ञान, विश्वाचे भविष्य’ अशी ठेवण्यात आली आहे. केंद्र सरकारची 7 मंत्रालये आणि 16 राष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून 17 प्रयोगशाळांमध्ये 26 विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि उद्योजकांसाठी विशेष कार्यक्रम असतील. सुमारे 1,800 विद्यार्थी आणि 200 शिक्षकांसाठी ‘न्यू नालंदा विज्ञान व तंत्रज्ञान ग्राम’, शिक्षकांसाठी ‘गुरुकुल’ कार्यशाळा, विद्यार्थी-शास्त्रज्ञ संवाद आणि ‘सायन्स सफारी’ हे आकर्षण ठरणार आहेत.

चांद्रयान-3 पासून खोल समुद्रातील संशोधनापर्यंतची सफर

महोत्सवात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे भव्य प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, 2000 मध्ये आयोजित सायन्स काँग्रेसनंतर प्रथमच पुण्यात एवढ्या मोठ्या स्तरावरील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विज्ञानविषयक उपक्रमाचे आयोजन होत आहे. चांद्रयान-3, गगनयान, आयएनएस विक्रांत, मिशन शक्ती, क्वांटम तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि खोल समुद्रातील संशोधन मोहिमांची माहिती येथे पाहायला मिळेल. याशिवाय हॅकेथॉन, कार्यशाळा आणि संवाद सत्रांच्या माध्यमातून नव्या कल्पनांना व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह विज्ञानप्रेमींसाठी हा महोत्सव विशेष पर्वणी ठरणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

केसनंद येथे राधाई मोबाइल शॉपी चार चोरट्यांनी फोडली; शेजारचे सराफी दुकानही फोडण्याचा केला प्रयत्न

Friday, 20 November 2026, 12:52

कोलवडी येथे तडीपार आरोपीचा कोयता घेऊन पाठलाग ; ‘थांब, आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत तरुणाच्या कारच्या काचा फोडल्या

Friday, 20 November 2026, 12:40

घरात कोणी नसल्याची संधी साधली? लामजेवाडीत चोरट्यांचा डाव; सोन्या-चांदीसह रोकड केली लंपास

Friday, 20 November 2026, 12:33

पुण्यात रेल्वे सेवा कोलमडली!300 विशेष फेऱ्यांचा नियमित गाड्यांना फटका; प्रवाशांचा प्रवास रखडला, मनस्ताप वाढला

Friday, 20 November 2026, 12:18

सिग्नल कसा तोडला म्हणत अडवले अन्… पुण्यात तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 20 November 2026, 12:09

कात्रज डेअरी चौकातील वाहतुकीत मोठा बदल! 19 नोव्हेंबरपासून स्वारगेटकडून येणारा राईट टर्न बंद

Friday, 20 November 2026, 11:55
Next Post

कात्रज डेअरी चौकातील वाहतुकीत मोठा बदल! 19 नोव्हेंबरपासून स्वारगेटकडून येणारा राईट टर्न बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp