Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कात्रज डेअरी चौकातील वाहतुकीत मोठा बदल! 19 नोव्हेंबरपासून स्वारगेटकडून येणारा राईट टर्न बंद

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 20 November 2026, 11:55

पुणे : स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो मार्गाच्या कामाला वेग देण्यासाठी कात्रज परिसरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मेट्रोच्या कामामुळे कात्रज मुख्य चौकातून जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक यापूर्वीच वळवण्यात आली आहे. आता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कात्रज डेअरी चौकातील मार्गरचनेतही बदल करण्यात आला आहे. हे नवीन नियम 19 नोव्हेंबर 2026 पासून लागू झाले असून, पुढील आदेश मिळेपर्यंत कायम राहणार आहेत.

या बदलांनुसार स्वारगेटहून कात्रज चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कात्रज डेअरी चौकात उजवीकडे वळता येणार नाही. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करणे आवश्यक आहे.

कुठून आणि कुठे घ्यावा यू-टर्न?

स्वारगेटकडून बालाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कात्रज डेअरी चौकाच्या सुमारे 250 मीटर आधी यू-टर्न घ्यावा. तर सरहद चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी चौक ओलांडल्यानंतर 250 मीटर पुढे यू-टर्न घेऊन पुढील प्रवास करावा.

दुसरीकडे, सरहद चौकाकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही मार्गात बदल करण्यात आला आहे. अशा वाहनचालकांनी कात्रज डेअरी चौकात पोहोचल्यानंतर डावीकडे स्वारगेटच्या दिशेने वळावे. त्यानंतर सुमारे 100 मीटर अंतरावर यू-टर्न घेऊन आपल्या इच्छित ठिकाणी जाता येईल.

वाहतूक पोलिसांचे आवाहन

मेट्रोच्या कामादरम्यान वाहनांची गर्दी होऊ नये आणि प्रवास सुरक्षित राहावा, यासाठी हे बदल लागू करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी नवीन वाहतूक नियमांची माहिती घेऊनच प्रवास करावा. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कात्रज डेअरी चौकातील वाहतुकीत मोठा बदल! 19 नोव्हेंबरपासून स्वारगेटकडून येणारा राईट टर्न बंद

Friday, 20 November 2026, 11:55

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 25 वर्षांनंतर विज्ञानाचा जागतिक महोत्सव रंगणार; जगातील नोबेलविजेते शास्त्रज्ञ येणार पुण्यात

Friday, 20 November 2026, 11:49

पुण्यात शिंदे गटाचा संघटनात्मक फेरबदल! कामचुकार पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी..

Friday, 20 November 2026, 11:39

महाराष्ट्रात FDA चे धाडसत्र! 2.23 कोटींचा अन्नसाठा जप्त; 23 विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Friday, 20 November 2026, 11:23

पुण्यात भररस्त्यात रक्तरंजित थरार! शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेला वाटेत गाठलं; धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या..

Friday, 20 November 2026, 11:22

पुण्यात पती-पत्नी अन् मेहुण्याचा कोट्यवधींचा फ्रॉड! गोड बोलून तब्बल 5.93 कोटींचा गंडा; फसवणुकीचा पर्दाफाश होताच खळबळ..

Friday, 20 November 2026, 11:05
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp