पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील जून-जुलै महिन्याचा हफ्ता बहिणींच्या खात्यात जमा झाला. पण ऑगस्ट आणि सप्टेबरचा हफ्ता अजून पर्यंत काही जमा झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी महिलाना लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. त्यामुळे या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळाला असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच योजना घोषित झाल्यापासून आता पर्यंत या योजनेत अनेक अटी शर्तींमध्ये शिथिलता आणण्यात आली आहेत. जेणे करून महिलांसाठी सुलभ होईल. या योजनेत प्रत्येक महिलेला दरमहा पंधराशे रूपये दिले जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाच्या होणा-या बैठकीत येत्या 29 सप्टेंबर रोजी या योजनेचे तिसऱ्या हप्त्याच्या वााटपावर शिक्कामोर्तब होऊ शकते. आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत.
महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे. आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे. त्या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत.