लहू चव्हाण
Eknath Shinde | पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकी पार पडली. याप्रसंगी स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याची जिल्ह्याधिकाऱ्यांना सूचना केली.
यावेळी तालुक्यातील गावठाण वाढीच्या मांडलेल्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,आरोग्य मंत्री तानाजी सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
जी बांधकामे चुकीची झाली आहेत अशा बांधकामांवर शासनाने जरुर कारवाई करावी…
महाबळेश्वर तालुका हा एको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत असून स्वातंत्र्य पूर्वकाळापासून तालुक्यातील कुठल्याच गावाला गावठाण वाढ मिळाली नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे स्थानिकांनी आपापल्या शेतात तसेच जागेत घरे बांधली आहेत. अशा बांधकामांवरच प्रशासनाने हातोडा मारण्याचा प्रयत्न चालू केला आहे.
आपण तालुक्याचे भूमिपुत्र आहात, त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांची घरे आपण अधिकृत करुन या प्रश्नाकडे सकारात्मकपणे पाहावे. त्याचबरोबर गावठाण वाढीचा निर्णय आपण तातडीने निकालात काढावा. असे भिलारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी महाबळेश्वरला बैठक घेवून स्थांकिनाशी चर्चा करूनच याबाबत निर्णय घेणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होता कामा नये याची दखल आपण घ्यावी, अशा सूचना केल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pachgani News : गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांचा सत्कार..!
Pachgani News : देवस्थान जमिनीवरील अनाधिकृत बांधकामांवरील वीज तोडणी तत्काळ थांबविण्याची भाजपची मागणी