मुंबई Eknath Shinde : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज (ता. ११) जाहीर झाला. (Eknath Shinde) यामध्ये न्यायालयाने म्हटले की ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर आहे. तर 16 आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. (Eknath Shinde) (Eknath Shinde) तसेच उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार पुन्हा आणता आले असते. असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde)
अखेर सत्याचा विजय झाला
सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या लोकशाहीमध्ये आपेक्षेनुसार लागला आहे. अखेर सत्याचा विजय झाला आहे. कायदेशीर बाबींचा उल्लेख कोर्टाने केला आहे.
लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. देशामध्ये संविधान, कायदा, नियम आहे. याच्या बाहेर कोणाला जाता येणार नाही, असे नेहमी सांगतो. हे सरकार सर्व कायदेशीर बाबी बघूनच स्थापन केले. आज कोर्टाने आता त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. जे लोक हे सरकार घटनाबाह्य असे सांगत होते, त्यांना कोर्टाने चपराक दिली असून त्यांना कालबाह्य केले आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अपात्रतेचा निर्णय विधान सभेच्या अध्यक्षांकडे आहे, असे आम्ही सांगत होतो. तसाच आपेक्षित निर्णय कोर्टाने दिला. निवडणुक आयोगााला अधिकार आहे, त्यानुसार निवडणुक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निर्णय दिला.
राज्यपालांनाच नव्हे तर राज्याला माहिती होते की सरकार अल्पमतात होते. त्यानंतर आम्ही बहुमताने कायदेशीर सरकार स्थापन केले. त्यामुळे नैतिकतेच्या गोष्टींना अर्थ नाही. आता अशा गोष्टी सुरु झाल्या आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने जनतेच्या मनातील सरकार स्थापले. विरोधी पक्षा सोबत जाताना तेव्हा नैतिकता कुठे हरवली होती ? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
Eknath Shinde शिंदे म्हणाले…
– माजी मुख्यंमंत्र्यांनी राजीनामा दिला कारण त्यांच्या ते अल्पमतात होते.
– बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाचण्याचे काम आम्ही केले.
– आता व्हिप लागायला तुमच्याकडे माणसे किती आहेत.
– अध्यक्ष आता मिरीटवर निर्णय घेतील.
– पक्ष कोणाचा हे देखील अध्यक्ष ठरवणार.
– जनतेच्या मनातील सरकार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : महाराष्ट्र सत्तासंघर्ष ! शिंदे गटाला मोठा धक्का ; भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर