Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘नको माझ्या मागं फिरू, माझं दुसरीकडं..’ गणवेशात व्हिडिओशूट करणाऱ्या पनवेल आगाराच्या ३ कर्मचाऱ्यांना थेट निलंबन; पहा व्हायरल VIDEO

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 7 August 2026, 21:09

मुंबई: कर्तव्यावर असताना सोशल मीडियासाठी रील तयार करणे पनवेल एसटी आगारातील तीन कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. एसटी महामंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून अधिकृत गणवेशात व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी परिवहन विभागाने तिघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल एसटी आगारातील महिला वाहतूक वाहक नंदा कोळी यांनी एसटी महामंडळाच्या गणवेशात रील तयार केला होता. या व्हिडिओमध्ये वाहतूक नियंत्रक विजय माने आणि सुनील देशमुख हे देखील सहभागी होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार परिवहन विभागाच्या निदर्शनास आला.

एसटी महामंडळाच्या नियमांनुसार, सेवेत किंवा कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांना रील्स तयार करणे, व्हिडिओ शूट करणे किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास परवानगी नाही. असे असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.

व्हिडिओची सत्यता पडताळल्यानंतर परिवहन विभागाने तिन्ही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर शिस्तभंगाची कारवाई करत तिघांनाही निलंबित करण्यात आले. कर्तव्यावर असताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

दरम्यान, राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी नवी आचारसंहिता लागू केली आहे. त्यानुसार एसटीची प्रतिमा मलिन होईल, असे व्हिडिओ किंवा इतर मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

नव्या नियमांनुसार चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना रील्स, व्हिडिओ किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच वाहन चालवताना व्हिडिओ तयार करणे, आगार, बसस्थानक, कार्यालय किंवा एसटी बसमध्ये गणवेशात सोशल मीडियासाठी चित्रीकरण करणेही नियमबाह्य ठरणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09
Next Post

विश्रांतवाडी पोलिसांची धडक कारवाई; सराईत वाहनचोराच्या मुसक्या आवळल्या, सुमारे 5 लाखांच्या ६ दुचाकी जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp