मुंबई : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती सध्या ठीक नसून ते आपल्या साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन करुन विचारपूस केल्याची माहिती समोर येत आहे.
मागील तीन दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी होते. परंतु ते आजारी पडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी काल शनिवारी विश्रांती घेतली आणि त्यांची तब्येत काही प्रमाणात बरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे आज दुपारी ते मुंबईला परतण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे मुंबईत परतल्यानंतर पुन्हा सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग येऊ शकतो.
राज्यात स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापन झालेलं नाहीयेय. मुख्यमंत्रीपदानंतर मंत्रीपदावरुन महायुतीत पेच आहे. यामुळे सरकारचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मुळगावी गेल्यानं महायुतीची बैठकही रद्द करावी लागली आहे.