Wednesday, May 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ‘एनडीए’च्या १४७ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न; चेतक हेलिकॉप्टर या लढाऊ विमानाने वेधले लक्ष..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 1 December 2024, 12:18

खडकवासला(पुणे) : खडकवासला येथील ‘एनडीए’त तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या छात्रांचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात पार पडला आहे. यावेळी संचलन सोहळ्यात हवाई दलाच्या विमानांनी दिलेली विशेष सलामी मुख्य आकर्षणाचा भाग ठरली. यावेळी भारतीय हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली आणि छात्रांना मार्गदर्शन केले. संचलनामध्ये ३५७ छात्र सहभागी झाले होते.

 

संचलनामध्ये ३५७ छात्र सहभागी..

यावेळी संचलनामध्ये ३५७ छात्र सहभागी झाले होते. यामध्ये २१५ लष्कर, ३८ नाविक दल आणि १०४ हवाई दलाच्या छात्रांचा समावेश होता. यासह भूतान, ताजिकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, मलेशिया, सुदान, टांझानिया, केनिया, झांबिया आणि मालदीव या मित्र देशांतील १९ छात्रांचाही या संचलनात समावेश होता. सध्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या प्रशिक्षण कालावधीत असलेल्या ४७ महिला छात्रांच्या तुकडीनेही संचलनात सहभाग घेतला होता.

यावेळी एअर व्हाइस मार्शल सरताज बेदी, ‘एनडीए’चे कमांडंट व्हाइस अॅडमिरल गुरुचरणसिंग, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आदी उपस्थित होते. अंकित चौधरी याला राष्ट्रपती सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले तर युवराजसिंग चौहान याला रौप्यपदक आणि जोधा थोंगजाउमायुम याला ब्राँझपदक देऊन गौरविण्यात आले. तर ‘गोल्फ’ स्क्वार्डनला ‘द चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ प्रदान करण्यात आला.

भारतीय हवाई दलाची मदार असलेल्या ‘सुखोई ३०’ या वेगाने हवेत झेपावणाऱ्या लढाऊ विमानांनी ‘एनडीए’च्या सुदान ब्लॉकवरून भरारी घेत संचलनाला मानवंदना दिली. त्या आधी आलेल्या चेतक हेलिकॉप्टर आणि ‘पी८आय पोसायडन’ या लढाऊ विमानानेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

तरुण अधिकारी या नात्याने भविष्यातील कोणत्याही संघर्षात तुमची भूमिका महत्त्वाची असणार आहे. शत्रूची रचना लक्षात घेऊन त्यांना पराभूत करणे आणि आपल्या महान राष्ट्राच्या अखंडतेशी तडजोड केली जाणार नाही, याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. कोणताही निर्णय घेताना आत्मविश्वासाने आणि निर्भीडपणे घ्या. ‘एनडीए’मध्ये शिकलेली प्रार्थना लक्षात ठेवा, ती तुम्हाला एक दिशादर्शकाचे काम नक्की करेल.

 

– अमरप्रीत सिंग, हवाईदल प्रमुख

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Big Breaking : पुणे–सोलापूर महामार्गावर फलकांशिवाय सुरू कामांमुळे गाडी थेट पुलाच्या जाऊन पलटी ; चौफुला ते वरवंड दरम्यानची घटना

Wednesday, 6 May 2026, 15:29

Bhor News : भोरमध्ये रस्ता कामावर वाद! नगरसेवकांच्या हरकतीमुळे विकास ठप्प; पद्मावती वस्तीतील नागरिक आक्रमक

Wednesday, 6 May 2026, 15:22
attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Murder Case : पुण्यात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; चार अल्पवयीन ताब्यात

Wednesday, 6 May 2026, 13:11

Katraj News : भिंतींच्या अरुंद फटीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

Wednesday, 6 May 2026, 12:58
Youth cheated for 99 lakh in pimpri chinchwad Pune

Pune Cyber ​​Fraud : डेटिंग ॲप, शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची तब्बल 20 लाखांहून अधिकची फसवणूक

Wednesday, 6 May 2026, 12:16

Pune Good News : पुण्यातील गरजू, वृद्ध व अनाथांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सन्मानपूर्वक वाटप, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा आदर्श उपक्रम

Wednesday, 6 May 2026, 12:06
Next Post

देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदेंना फोन; प्रकृतीची केली विचारपूस...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.