Pune Good News लोणी काळभोर, ता. 6 : समाजातील दुर्बल, उपेक्षित आणि गरजू घटकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारा एक अत्यंत प्रेरणादायी आणि मनाला भिडणारा सामाजिक उपक्रम लोणी काळभोर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, पुणे ग्रामीण मंडळाचे सचिव सचिन मखर यांच्या पुढाकाराने तसेच त्यांच्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने अनाथ आश्रमातील बालकं, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक आणि रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या गरजू नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले. Pune Good News

या उपक्रमांतर्गत तेल, साबण, कंगवा, टूथब्रश, कोलगेट तसेच स्वच्छता व दैनंदिन गरजांसाठी आवश्यक साहित्य असलेली किट्स लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. या मदतीमुळे गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि कृतज्ञतेचे भाव उमटल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले.या सामाजिक उपक्रमात दत्तात्रय शिंदे, सुमंत लोखंडे, अमन कुंभार, किशोर चव्हाण यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत प्रत्येक गरजूंपर्यंत मदत पोहोचवली. “देणं हेच खऱ्या आनंदाचं मूळ आहे” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. Pune Good News

याच उपक्रमाचा विस्तार म्हणून उरुळी देवाची, वडकी, हडपसर, स्वारगेट, पुलगेट, पुणे रेल्वे स्टेशन तसेच ससून हॉस्पिटल परिसरातील बेवारस व रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुमारे 200 किटचे वाटप करण्यात आले. प्रत्येक किटची किंमत अंदाजे 150 रुपये असून, स्वच्छता व दैनंदिन गरजा लक्षात घेऊन हे किट तयार करण्यात आले होते. Pune Good News
या कार्यक्रमादरम्यान समाजात सहानुभूती, माणुसकी आणि एकोप्याची भावना अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच असे उपक्रम सातत्याने राबवून अधिकाधिक गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. समाजातील प्रत्येकाने थोडासा हातभार लावला, तर अनेक निराधारांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, हा प्रभावी संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. Pune Good News







