Pune Murder Case पुणे, ता. ६ : धनकवडी परिसरातील आंबेगाव पठार येथे किरकोळ कारणावरून तरुणाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ४ मे) रात्री सुमारे सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. Pune Murder Case

नयन सचिन जाधव (वय १८, रा. आंबेगाव पठार) असे मृत तरुणाचे नाव असून, याबाबत त्याच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि नयन हे सर्व एकाच परिसरात राहत होते. दोन दिवसांपूर्वी एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. Pune Murder Case
दरम्यान, नयन आंबेगाव पठार येथील निलगिरी चौकात उभा असताना आरोपी अल्पवयीनांनी त्याला गाठले. सुरुवातीला शिवीगाळ करत वाद वाढवण्यात आला. त्यानंतर संतापाच्या भरात त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालण्यात आला आणि तीक्ष्ण शस्त्राने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत नयनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. Pune Murder Case
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पसार झालेल्या चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार त्यांना निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास कोडग करत आहेत. या घटनेमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, किरकोळ कारणावरून होणाऱ्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. Pune Murder Case







