Buldhana News : बुलढाणा : मला माझ्या वडिलांची आणि मराठा आरक्षणाची देखील तेवढीच काळजी आहे. आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत आहोत. सरकारने आम्हाला त्वरित आरक्षण द्यावे. आम्ही मराठा असून, पेटून उठलो आहोत, आता आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. सरकारला पण याची दखल घ्यावी लागेल, अशा शब्दांत पल्लवी जरांगे-पाटील हिने सरकारले ठणकावले.
बुलढाण्यात मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलनासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची पल्लवी ही मुलगी आहे. मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी बुलढाण्यात आज ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणा करत मराठा क्रांती मोर्चा आयोजित केला आहे. (Buldhana News) या मोर्चात आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी जरांगे पाटील सहभागी झाली आहे.
या वेळी बुलढाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांना मराठा समाजाच्या वतीने पाच तरुणींनी निवेदन सादर केले. (Buldhana News) या मोर्चासाठी बुलढाण्यात दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या कन्या पल्लवी पाटील हिने माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी तिला आंदोलनाबाबत विचारले असता, तिने मला माझ्या वडिलांची आणि आरक्षणाची देखील काळजी असल्याचे सांगितले.
वडील मनोज जरांगे पाटील आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाहीत,(Buldhana News) असा विश्वास पल्लवी हिने व्यक्त केला. आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्या, मला माझा बाप हवाय, अशी आर्त साद तीने घातली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Buldhana News : मोठी बातमी! मलकापूर-बुलढाणा एसटी बसला भीषण अपघात; ५५ प्रवाशांची बस घाटात उलटली!
Buldhana News : मित्रासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी आलेल्या महिलेवर ८ जणांकडून सामूहिक अत्याचार..
Buldhana News : शिक्षण क्षेत्रात खळबळ! एक लाखाची लाच घेताना लिपिक एसीबीच्या जाळ्यात