Breaking News : मुंबई : तुमचा लवकरंच दाभोळकर होणार…अशी जीवे मारण्याची धमकी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर अकाऊंटवर देण्यात आली. या धमकीनंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद कराल असे वाटत असेल तर हा गैरसमज आहे. अशा शब्दात पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar’s first reaction after the death threat said…)
धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद कराल असे वाटत असेल तर हा गैरसमज
शरद पवार म्हणाले, कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार या जनतेच्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि असं असताना धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद कराल असे वाटत असेल तर हा गैरसमज आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली आहे. (Breaking News) महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, त्यामुळे मला चिंता नाही. पण ज्यांच्या हातात राज्यातील सुत्रे आहेत.. त्यांना जबाबदारी टाळता येत नाही.
“आदरणीय पवार साहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार…’अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे.(Breaking News) केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावे. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावं, हेच राज्याच्या हिताचं असेल,” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
“तुझा लवकरच दाभोळकर होणार” अशी धमकी सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :