Big News : हिंगोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. अनेक गावांमध्ये नेते, मंत्री, आमदार यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. काही आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठींबा देत सरकारला धारेवर धरले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
आंदोलनाचे राज्यभर पडसाद
मराठा आरक्षणाची मागणी केंद्र सरकारच्या दरबारी मांडावी यासाठी काही आंदोलकांनी खासदार हेमंत पाटील यांची भेट घेतली. या वेळी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या, अशी मागणी केली. (Big News) या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे स्वतःच्या लेटर हेडवर राजीनामा लिहून आंदोलकांना दिला. मराठा समाजाच्या आंदोलनाला त्यांनी पूर्ण पाठींबा दर्शवला आहे.
हिंगोली आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आहे. हेमंत भाऊ या नावाने ते या दोन्ही जिल्ह्यांत परिचित आहेत. हिंगोली मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते जिंकले. (Big News) उद्धव ठाकर यांचे जवळचे समजले जाणारे हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. (Big News) मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाला माझा पाठींबा आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : साखळी बॉम्बस्फोटांनी केरळ हादरले! कन्वेंशन सेंटरमध्ये टिफिनमध्ये ठेवला होता बॉम्ब
Big News : रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी ; आधारकार्डशिवाय ‘नो एन्ट्री’,