Big News : जालना : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस असल्याने, त्यांची प्रकृती ढासळत आहे. राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. आंदोलनाला काही भागात हिंसक वळण मिळत आहे. जाळपोळ, मोडतोडीच्या घटना घडत आहेत. अनेक भागांमध्ये लालपरीला लक्ष्य केले जात आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण सुरूच ठेवणार, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आता आमदार बच्चू कडू सरसावले आहेत. सरकार आणि जरागे यांच्यामध्ये संवाद घडवण्याची जबाबदारी बच्चू कडू यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यापुढे जरांगे यांचे आंदोलन सुरू असेपर्यंत आमदार बच्चू कडू अंतरवली सराटी येथेच तळ ठोकणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
उपोषण सुरूच ठेवणार, या मागणीवर जरांगे ठाम
दरम्यान, राज्यात अनेक गावांत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आंतरवाली सराटी गावात देखील नेत्यांना येण्यास आंदोलकांकडून सक्त मनाई करण्यात आली होती. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागावा यासाठी एक पाऊल मागे घेऊन आपण सरकारसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली होती. (Big News) जरांगे यांनी सरकारशी चर्चा करण्याची तयारी दाखविल्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी सरकारची बाजू मांडण्यासाठी बुधवारी जरांगे यांची भेट घेतली. या वेळी कडू यांनी जरांगे यांना पाणी पिण्याची विनंती कली. मात्र, जरांगे यांनी याला ठामपणे नकार दिला.
दरम्यान, सरकारचे एक शिष्टमंडळ आज जरांगे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. या वेळी सरकारची भूमिका आणि आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न याची माहिती हे शिष्टमंडळ जरांगे यांना देणार आहे. (Big News) सर्वपक्षीय बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती देखील दिली जाणार असून, उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : मंत्रालयाबाहेर आंदोलन करणारे आमदार पोलिसांच्या ताब्यात