Big News : मुंबई : मराठवाड्यातील विकासकामांसाठी ४५ हजार कोटींचा निधी जाहीर करण्यात आला. याशिवाय, जलसिंचन व्यतिरिक्त इतर विकास प्रकल्पांची घोषणाही आज करण्यात आली. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
संभाजीनगर येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘एकूण 60 हजार कोटींचा निधी देण्यात येणार असून, यामध्ये 35 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली आहे. यामुळे 8 लाख हेक्टर जमिन ओलिताखाली येईल. यासाठी 14 हजार कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. (Big News) यानंतर विविध प्रकल्पांसाठी 45 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा निर्णय घेण्यात आला आहे’.
लोक केवळ बोटे दाखवण्याचे काम करतात
४ ऑक्टोबर २०१६ ला मराठवाड्यात शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली, त्यात एकूण ३१ निर्णय घेतले होते. यापैकी २२ विषय अवगत केले होते, तर काही विषयांवर निर्देश झाले होते. तर एक विषय उद्धव ठाकरे यांच्या काळात रद्द झाला, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.(Big News) तसेच विरोधकांवर टीका करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जे स्वतः काहीही करत नाहीत असे लोक केवळ बोटे दाखवण्याचे आणि नावे ठेवण्याचे काम करतात. खरेतर मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाले? असे विचारणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे की तुम्ही अडीच वर्षात काय केले?, असे ते म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : मुंबई विमानतळावर विमान क्रॅश ; तीन जण जखमी; विमानांचे टेक ऑफ, लँडिंग बंद
Big News : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला धक्का; नियम न पाळल्याने ट्विटर अकाउंट सस्पेंड