Big Breaking : नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवली होती. मात्र, चार महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही राहुल नार्वेकर यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. पुढील आठवड्यात सुनावणी ठेवून दोन आठवड्यांमध्ये कोर्टात अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश सरन्यायाधीशांनी दिले.
दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी अभ्यास करुन, दोन्ही बाजूच्या भूमिका ऐकून निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. पण त्यानंतर बरेच दिवस या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात गाठले. सुप्रीम कोर्टात याआधीच्या सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना काय कारवाई केली, याबाबत विचारणा केली. (Big Breaking) कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना काय कारवाई केली याची माहिती पाठवण्याची नोटीसही बजावली. नोटीसीनंतर नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना मत मांडण्यासाठी नोटीस बजावली. दोन्ही गटाकडून लेखी स्वरुपात मत मांडण्यात आले. त्यानंतर गेल्या आठवड्यात प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी काही कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा करत, आणखी काही वेळ वाढवून देण्याची विनंती केली. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांची मागणी मान्य केली.
ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या वेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. “सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर राखला गेला नाही”, असे कोर्टाने म्हटले आहे. एक आठवड्यात सुनावणी घ्या.(Big Breaking) दोन आठवड्यात काय कारवाई केली ते आम्हाला सांगा. ठराविक वेळेत निर्णय घ्या, असे निर्देश याआधी दिले होते. त्यामुळे आता एक आठवड्यात कारवाई करा, कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा आहे, असे कोर्टाने म्हटले आहे.
येत्या एक आठवड्यात सुनावणी घ्या, असा स्पष्ट आदेश कोर्टाने दिला आहे. त्यामुळे या एका आठवड्यात अंतिम निकाल लागणार का, याची उत्सुकता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : दिवे घाटात बांधकाम मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी ; १२ जण जखमी