BIG BREAKING NEWS : पालघर : अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीतील तब्बल पस्तीस विद्यार्थ्यांना शिक्षेच्या नावावाखील जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातून उघडकीस आला आहे. या मारहाणीत एका विद्यार्थ्याचा कानाचा पडद्याला इजा झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, अकरावीतील सहा ते सात विद्यार्थ्यांनी उदयगिरी हाऊसमध्ये दहावीच्या 35 विद्यार्थ्यांना तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहे सांगत 30 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले. विद्यार्थी उदयगिरी हाऊसमध्ये दाखल झाले. पण उशीरा आलेल्या विद्यार्थ्यंना उभं राहाण्यास सांगण्यात आले.त्यानंतर उशीरा का आले अशी विचारणा करत विद्यार्थ्यांच्या गालावर सात ते आठ फटके मारण्यात आले. एका विद्यार्थ्याच्या गुप्तागांवर गुडघ्याने मारण्यात आल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. तब्बल एक तास हा प्रकार सुरु होता. महाविद्यालय प्रशासनाला याची जराही भनक नव्हती. (BIG BREAKING NEWS) रात्री बारानंतर सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेलवर त्यांच्या-त्यांच्या रुममध्ये पाठवण्यात आलं. घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला तर वाईट परिणाम होतील अशी धमकीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
दुसऱ्या दिवशी मारहाण झालेल्या दहाविच्या निखिल सिंग नावाच्या विद्यार्थ्याचा कान दुखू लागले. सिंग ला डॉक्टरांकडे घेऊन गेले असता, डॉक्टरांनी कानाची दुखापत पाहून कोणी मारलं आहे का अशी विचारणा विद्यार्थ्याकडे केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. (BIG BREAKING NEWS) कानावर सात ते आठवेळा मारल्याने कानाच्या पडद्याला इजा झाली असून कानाचा पडदा फाटण्याची शक्यताही डॉक्टरांनी वर्तवली आहे. अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय कानावर शस्त्रक्रिया करता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, याशिवाय विशाल कुशवा आणि सुशांत सोनकर यां विद्यार्थ्यांच्या गालावर आठ ते नऊ वेळा जोरजोरात मारण्यात करण्यात आली आहे. (BIG BREAKING NEWS) या मारहाणीत विशालचा कान सुजला होता तर सुशांत सोनकर त्याच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. तर कौस्तुभ मोरे यालाही जबर मारहाण करण्यात आल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
संतापजनक बाब म्हणजे आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबद्दल विद्यालय प्रशासनासाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : पुणे-सोलापूर मार्गावर धावणार १० ‘ई-शिवाई’ ; प्रवाशांना दिलासा