Big Breaking : मुंबई : राजकीय वर्तुळातून पुन्हा एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काही वेळा पूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Death threat to Sanjay Raut after Sharad Pawar)
फ़ोनवरून देण्यात आली धमकी
संजय राऊत यांचे भाऊ आणि विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांच्या फोनवरं त्यांना ही धमकी देण्यात आले. शरद पवार आणि संजय राऊत यांना एकाच वेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.(Big Breaking )
तर पवार यांना सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर अकाऊंटवर धमकी दिली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकीची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहे. (Big Breaking ) खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह काही वेळात मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचल्या आहेत.
दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे.