Big Breaking : मुंबई : मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळून अपघात झाल्याची धक्कादायक घटना सरलांबेजवळ (ता. शहापूर, जि. ठाणे ) सोमवारी (ता.३१) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या अपघातात १६ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १ जण गंभीर जखमी झाला आहे.
शहापूर तालुक्यातील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, सरलांबे येथे समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू आहे. एका खासगी कंपनीने या कामाचे कंत्राट घेतले आहे. त्या ठिकाणी २२ कर्मचारी काम करत होते. (Big Breaking) सोमवारी रात्री पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू होते. तयार झालेले सिमेंटचे पुलाचे भाग उचलणारे महाकाय मशीन १०० फुटांवरून खाली कोसळले.
दरम्यान, या अपघातात अनेक कामगार दाबले गेले आहेत. आतापर्यंत १७ पैकी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. एका जखमीला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात तर दोन जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. (Big Breaking) अजून पाच ते सहा जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.