Bhandara News : भंडारा : भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील विहिरीत कासव दिसल्याने, कासव पकडण्यासाठी तीन शेतमजूर विहिरीत उतरले. मात्र, खोल विहिरीत असलेल्या विषारी वायूमुळे तिघांचा श्वास गुदमरला. हा प्रकार शेतातील महिलांच्या लक्षात येताच त्यांना वाचवण्याचे अन्य साधन न सापडल्याने प्रसंगावधान राखून त्यांनी अंगावरच्या साड्या सोडून त्याचा दोर बनवला आणि विहिरीत सोडला. या दोराच्या साह्याने एकाला वाचवण्यात यश आले. मात्र, दोघांचा गुदमरून विहिरीतच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गडपेंढरी येथे बुधवारी घडली.
लाखनी तालुक्यातील गडपेंढरी येथील घटना
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दयाराम भोंडे (वय ३५), मंगेश गोंदळे (वय २५) अशी मृत तरुणांची नावे आहेत. विष्णू गायधने त्यांच्या शेतात भात पिकाची लागवड सुरू आहे. (Bhandara News ) यासाठी लगतच्या भुगाव मेंढा येथील हे दोघे आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत शेतात आले होते. गायधने यांच्या शेतातील विहिरीत कमी पाणी असल्याने त्यात त्यांना कासव दिसला. तो काढण्यासाठी हे दोघे विहिरीत उतरले. विहिरीत कमी पाणी असल्याने विषारी वायूमुळे दोघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विहिरीतील कासवांना बाहेर काढण्यासाठी मंगेश जय गोपाल गोंदळे (मेंढा भुगाव) आणि दयाराम सोनीराम भोंडे (मेंढा भुगाव), सुधीर मोरेश्वर हजारे हे तीन तरुण उतरले होते. (Bhandara News ) पण विहिरीत गॅस असल्याने तिघांनाही गुदमरायला लागले. दरम्यान, विहिरीत उतरलेल्या तरुणांना गुदमरत असल्याचे लक्षात येताच महिलांनी आरडाओरड सुरू केली.
विहिरीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी कोणतेच साहित्य जवळपास नव्हते. तेव्हा प्रसंगावधान राखत शेतमजूर असलेल्या महिलांनी स्वत:च्या अंगावरच्या साडीचा दोर करून विहिरीत फेकला.(Bhandara News ) महिलांना सुधीर मोरेश्वर हजारे या तरुणाचे प्राण वाचवता आला. मात्र, दुर्दैवाने इतर दोन तरुणांचा यात मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी जूनमध्ये तिरोडा (जि. गोंदिया) येथे घरगुती विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून चार जणांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील सरांडी येथे घडली होती. (Bhandara News ) खेमराज गिरधारी साठवणे (वय ४४), प्रकाश सदाशिव भोंगाडे (४०), सचिन यशवंत भोंगाडे (28), महेंद्र सुखराम राऊत (34, सर्व रा. सरांडी) अशी मृतांची नावे आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : येरवडा कारागृह पोलीस शिपाई आत्महत्येचे गूढ अखेर उकलले; सहा जणांवर गुन्हा दाखल
Pune News : आयईटीईच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदी डॉ. रवींद्र खराडकर यांची निवड.