Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhandara News : कासव पकडायला विहिरीत उतरणे भोवले; महिलांनी अंगावरची साडी सोडून बनवला दोर; एकास जीवदान पण…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 July 2023, 18:03

Bhandara News  : भंडारा : भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील विहिरीत कासव दिसल्याने, कासव पकडण्यासाठी तीन शेतमजूर विहिरीत उतरले. मात्र, खोल विहिरीत असलेल्या विषारी वायूमुळे तिघांचा श्वास गुदमरला. हा प्रकार शेतातील महिलांच्या लक्षात येताच त्यांना वाचवण्याचे अन्य साधन न सापडल्याने प्रसंगावधान राखून त्यांनी अंगावरच्या साड्या सोडून त्याचा दोर बनवला आणि विहिरीत सोडला. या दोराच्या साह्याने एकाला वाचवण्यात यश आले. मात्र, दोघांचा गुदमरून विहिरीतच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गडपेंढरी येथे बुधवारी घडली.

लाखनी तालुक्यातील गडपेंढरी येथील घटना

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दयाराम भोंडे (वय ३५), मंगेश गोंदळे (वय २५) अशी मृत तरुणांची नावे आहेत. विष्णू गायधने त्यांच्या शेतात भात पिकाची लागवड सुरू आहे. (Bhandara News ) यासाठी लगतच्या भुगाव मेंढा येथील हे दोघे आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत शेतात आले होते. गायधने यांच्या शेतातील विहिरीत कमी पाणी असल्याने त्यात त्यांना कासव दिसला. तो काढण्यासाठी हे दोघे विहिरीत उतरले. विहिरीत कमी पाणी असल्याने विषारी वायूमुळे दोघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

विहिरीतील कासवांना बाहेर काढण्यासाठी मंगेश जय गोपाल गोंदळे (मेंढा भुगाव) आणि दयाराम सोनीराम भोंडे (मेंढा भुगाव), सुधीर मोरेश्वर हजारे हे तीन तरुण उतरले होते. (Bhandara News ) पण विहिरीत गॅस असल्याने तिघांनाही गुदमरायला लागले. दरम्यान, विहिरीत उतरलेल्या तरुणांना गुदमरत असल्याचे लक्षात येताच महिलांनी आरडाओरड सुरू केली.

 

विहिरीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी कोणतेच साहित्य जवळपास नव्हते. तेव्हा प्रसंगावधान राखत शेतमजूर असलेल्या महिलांनी स्वत:च्या अंगावरच्या साडीचा दोर करून विहिरीत फेकला.(Bhandara News )  महिलांना सुधीर मोरेश्वर हजारे या तरुणाचे प्राण वाचवता आला. मात्र, दुर्दैवाने इतर दोन तरुणांचा यात मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी जूनमध्ये तिरोडा (जि. गोंदिया) येथे घरगुती विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून चार जणांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील सरांडी येथे घडली होती. (Bhandara News ) खेमराज गिरधारी साठवणे (वय ४४), प्रकाश सदाशिव भोंगाडे (४०), सचिन यशवंत भोंगाडे (28), महेंद्र सुखराम राऊत (34, सर्व रा. सरांडी) अशी मृतांची नावे आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : येरवडा कारागृह पोलीस शिपाई आत्महत्येचे गूढ अखेर उकलले; सहा जणांवर गुन्हा दाखल

Pune News : ”शासन आपल्या दारी”, पण ‘शासनाचे अधिकारी त्यांच्या घरी’, दौंडमध्ये शासकीय उपक्रमाला आधिकर्‍यांनी फिरविली पाठ

Pune News : आयईटीईच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदी डॉ. रवींद्र खराडकर यांची निवड.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Bhigwan News : तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेसाठी दीड कोटीचा निधी देणार; हर्षवर्धन पाटील यांचे आश्वासन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.