Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : समृद्धी महामार्ग अपघात! बारामतीतील काळे कुटुंबियांच्या तीन नातेवाईकांचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 July 2023, 11:24

Baramati News : बारामती(पुणे) : समृद्धी महामार्गावर एका खासगी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील तब्बल २५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे बारामतीतील काळे कुटुंबीयांना धक्का बसला. येथील ॲड. अमर काळे यांची बहीण कांचन गंगावणे (वय ३८), त्यांचे पती कैलास गंगावणे (वय ४८) व सई गंगावणे (वय २०) या शिरुर (जि. पुणे) तालुक्यातील तिघांचाही या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बारामती शहरात शोककळा पसरली आहे.

बारामती शहरात शोककळा

नागपूरहून पुण्याच्या दिशेने गंगावणे कुटुंब प्रवासासाठी विदर्भ ट्रॅव्हल्सने निघाले होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. (Baramati News) त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळेस त्यांच्यावर काळाने घाला घातला.

सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थीनी होती. तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता व ती वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुळचे शिरूर येथील हे कुटुंब नोकरीच्या निमित्ताने निरगुडसर येथे वास्तव्यास आहे. कैलास गंगावणे हे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात २७ वर्ष प्राध्यापक म्हणून काम करत होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय विदर्भ ट्रॅव्हल्स बसने पुण्याला यायला निघाले होते. (Baramati News) या तिघांचाही फोन लागत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर व बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अमर काळे यांनी शोध सुरू केला.

 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनी देखील तातडीने हालचाल करून या अपघाताबाबत बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांची संपर्क साधून तातडीने माहिती घेतली. (v) नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव असून त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघातस्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षाप्रत पोलीस आलेले आहेत. दरम्यान काळे कुटुंबीयांनी गंगावणे कुटुंबीय याच बसमधून प्रवास करत होते, या वृत्तास दुजोरा दिला आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तात्काळ सुरक्षितता उपाययोजना करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
तसेच नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा –सिंदखेड राजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी असल्याची संवेदना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Baramati News : बारामतीतील सरकारी कार्यालये पुण्यापेक्षा चांगली… काय म्हणाले रवींद्र धंगेकर?

Baramati News : पोलीस कर्मचाऱ्यासह सराफाचा महिलेवर बलात्कार; बारामती शहर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल!

Baramati News : बारामतीतील शिक्षक चक्क दारू पिऊन वर्गातच झोपला ; गावकऱ्यांनी व्हिडिओ केला व्हायरल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44
Next Post

Pune News : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप प्रकरण: केसमधील मोठी माहिती आली समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.