Ajit Pavar : बारामती, (पुणे) : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बारामतीत अनेकांनी बॅनर लावले आहेत. “आमचा विठ्ठल, आमचा दादा” या आशयाचे बॅनर लावल्याने त्यांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्या बॅनरवरून चक्क शरद पवार यांचा फोटो नसल्याने अजित पवार यांची नेमकी भूमिका काय याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. Ajit Pavar
राष्ट्रवादीचे नेत अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. यातच शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटातील दोन मोठ्या नेत्यांवर बडतर्फीची कारवाई केली. लगेत अजित पवार गटाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच पदावरून हटवले. या वेळी अजित पवार यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार उत्तरले, शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, विसरलात का? आम्ही पक्ष सोडलेला नाही, फक्त बेरजेचे राजकारण करत आहोत. या उत्तरानंतर कार्यकर्ते गोंधळले आहेत.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून बंड करत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसह मंत्री पदाची ही शपथही घेतली. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा सक्रिय होत त्यांना शह देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, या बॅनरबाजीमुळे अजित पवारांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी दाखल होत आपल्या पुढच्या रणानितीचे रणशिंग फुंकले आहे.
दरम्यान, अजित पवार उपमुख्यमंत्री पदाच्या बॅनरवरून शरद पवार यांचा फोटो गायब झाला आहे. फक्त अजित पवार यांचाच फोटो बॅनरवर दिसत आहे. अजित पवार यांच्या विठ्ठलाचाच फोटो बॅनर वरून गायब झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्या निवडीचे बॅनर लावला तर शरद पवार साहेबांचा देखील फोटो लावावा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. Ajit Pavar