अजित जगताप
सातारा : Mahad News – भारत देशात जातीय मानसिकतेतून गरीब व दलित- पददलित नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ही बाब इतिहासात नोंद घेणारी ठरली. महाडच्या चवदार तळ्याचा (Chavdar lake at Mahad) सत्याग्रह यशस्वी झाला. आज तळ्याला स्पर्श करून अभिवादन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील (Satara district) पाच हजार (5000 Bhimsain) तर संपूर्ण देशातून दोन ते अडीच लाख आंबेडकर अनुयायी भेट देणार आहेत. त्यामुळे चवदार तळे परिसर गजबजून जाणार आहे. (Mahad News)
सामाजिक सबलीकरण व समता दिन म्हणून भारतात साजरा करतात
या डॉ. आंबेडकर अनुयायांना चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या बाबतीत अनेक माहिती उपलब्ध झाली असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठ्या संख्येने अभिवादन केले जात आहे. हा दिवस सामाजिक सबलीकरण व समता दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. सध्या महाड नगरपरिषद व राज्य शासनाने ही चवदार तळ्याच्या सुशोभीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केलेला आहे. तसेच विशेष बाब म्हणजे फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील उद्योगपती दिवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि २० मार्च १९२७ रोजी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्याचे स्मरण कायम व्हावे यासाठी ”20 मार्च” ही शुध्द पिण्याच्या पाण्याची बाटली बंद उत्पादन सुरू केलेले आहे. त्याला भरघोस पाठिंबा मिळत आहे.
दरवर्षी सातारा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने चवदार तळे महाडच्या दिशेने अनुयायी जात असतात. त्यांच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने घेतलेले आहे. या ऐतिहासिक महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त सातारा जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या विविध संघटना तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर अभिवादन कार्यक्रम घेतलेले आहे. त्यालाही उदंड प्रतिसाद लाभत आहे.
सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमोल गंगावणे,प्रा.ऍड. विलास वहागावकर, रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश, अजित साठे, रिपब्लिकन पक्षाच्या (निकाळजे गट) खटाव तालुकाध्यक्ष सागर भिलारे, विकास जाधव, महिला जिल्हाध्यक्ष आरती अग्रवाल,शंकर लोकरे,मुन्ना शेख, प्रशांत कीर्तिकर, अशोक मदने,रिपब्लिकन पक्षाचे महिला आघाडी प्रमुख कुमारी पूजा बनसोडे व इतर युवक आघाडीचे राजेंद्र ओव्हाळ, मदन खंकाळ, वैभव गायकवाड, मिलिंद कांबळे, अरुण पोळ व मान्यवरांनी ही स्थानिक पातळीवर अभिवादन कार्यक्रम आयोजित केलेला आहे.